Latest News

स्मशानभूमीच्या जागेवरच केले अतिक्रमण ! चांदुर रेल्वे तालुक्यातील वाई येथील प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही तहसिलदारांनी नाही केली कारवाई – गावकरी

अनेक तक्रारीनंतर ही प्रकरण जैसे थे

चांदुर रेल्वे-(शहेजाद खान)–


आता पर्यंत दुसऱ्याच्या मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या व ऐकल्या. मात्र आता लोकांना गावाची स्मशान भूमीही कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील वाई (सिंगल) येथे चक्क गावाच्या तीन एकर स्मशानभूमीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे
      प्राप्त माहितीनुसार वाई (सिंगल) येथे गावाला लागून हिंदू व बौद्ध स्मशानभूमी असून ती जागा पिढ्यानपिढ्या अंदाजे 300 वर्षापासून ते आज पर्यंत स्मशानाकरिता राखीव ठेवली आहे. त्या स्मशानभूमीची संपुर्ण तीन एकर जमीन धामणगाव रेल्वे तालुक्यातील गंगाजळी येथील भगवंत विश्वनाथ वानखडे यांनी मागील वर्षापासून नागरुण शेती करने सुरु केले आहे. या स्मशान भूमीमध्ये गावातील मयत लोकांचे प्रेत दफ़न केले असून खोलवर नागरण केल्याने तेथील दफ़न प्रेताचे सांगाडे बाहेर येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच भगवंत वानखड़े यांच्याजवळ गंगाजळी येथे 3 ते 4 एकर ज़मीन असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हनुमान मंदिराच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण केल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. या बाबत गावकऱ्यांनी तलाठी,मंडल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी सोबतच जिल्हाधिकारी यांना तक्रार व निवेदने दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. मात्र यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याशिवाय ग्रामपंचायत सरपंचासह नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून पोलिसांनी कलम 34, 427, 447 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु पुढील कारवाई अद्यापही झाली नाही. त्यामुळे सध्या ग्राम वाई येथे जर कोणाच्या घरी मैयत झाली तर प्रेत जवळच असलेल्या सांगुलवाडा या गावातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी न्यावे लागते. त्यामुळे शासनाच्या आदेशाची येथे पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
  मानवाला जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागतो तर मेल्यानंतरही  प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी राखीव जागेवर सुद्धा हाच मानव अतिक्रमण करतो ही बाब प्रेताच्या टाळूवारील लोनी खान्याचाच प्रकार असल्याची चर्चा नागरिकात उमटत आहे.

via Blogger http://ift.tt/2dO5hGu




from WordPress http://ift.tt/2dqqqFM
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.