आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंना संबोधित
|
उज्जैन (मध्यप्रदेश)– कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकाल मंदिराच्या समोरील मार्गावर मुसलमानांकडून नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम करण्यात आले आहे. या विरोधात १९ ऑक्टोबरला येथील गुदरी चौकात हिंदूंच्या विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याला २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी प्रशासनाने सदर अवैध बांधकाम करणारे, त्याच्याकडे कानाडोळा करणारे पोलीस अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करून हे अतिक्रमण तात्काळ पाडावे; अन्यथा हिंदू ते पाडून टाकतील, अशी चेतावणी प्रशासनाला देण्यात आली. या आंदोलनाच्या शेवटी उपरोक्त मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. समस्त हिंदू समाजाच्या वतीने श्री. कुलदीपक जोशी यांनी या आंदोलनाचे संचालन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनीही मार्गदर्शन केले.
या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिराच्या समोरील मार्गावर तोपवली मशिदीच्या समोर नगरपालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था केली जाते. या जागेवर मुसलमानांकडून अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले. या संदर्भात नगरपालिकेकडून अनेकदा नोटिसा पाठवूनही त्याला मुसलमानांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. महाकालच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हिंदू भाविक आणि कावड यात्रेकरू येत असतात. यापूर्वी येथे कावड यात्रेकरूंवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या अवैध बांधकामाद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतुतः प्रयत्न केला जात आहे. यावर प्रशासनाने आंधळेपणाने पहात न बसता यावर कारवाई करावी.
- या आंदोलनाला पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता.
- आंदोलन काळात गुदरी चौकातील व्यापार्यांनी दुकाने बंद करून आंदोलनाला पाठिंबा दिला.
- मोठ्या प्रमाणात जमलेले युवक आणि जय महाकालच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.
via Blogger http://ift.tt/2eojlJ5
from WordPress http://ift.tt/2ezmWDl
via IFTTT
No comments:
Post a Comment