वर्धा – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि मूर्तीभंजन या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण आणि ठोस कृती व्हावी, तसेच हिंदूंवर केल्या जाणार्या अत्याचारांविषयी संयुक्त राष्ट्रसंघात सूत्र उपस्थित करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची सद्यस्थिती, हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयीची उदाहरणेही या वेळी समितीच्या सौ. रत्ना हस्ती यांनी सांगितले.
क्षणचित्र – रस्त्यावरून येणारे जाणारे अनेक जण थांबून आंदोलनातील विषय ऐकत होते.
क्षणचित्र – रस्त्यावरून येणारे जाणारे अनेक जण थांबून आंदोलनातील विषय ऐकत होते.
via Blogger http://ift.tt/2ihrs9W
from WordPress http://ift.tt/2h3PsfV
via IFTTT
No comments:
Post a Comment