आज एंड्राइड मोबाईल शाहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचले आहे. मोठ्यांपासून ते लाहन्यापर्यंत या मोबाईल चे वेड लागले आहे परंतु विद्यार्थ्यांनी मोबाईलचे खेळ सोडून मैदानी खेळा कड़े वळने गरजेचे आहे व त्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रेरित करावे असे मत जि. प. सदस्य प्रवीण घुईखेड़कर यांनी व्यक्त केले.
जि. प. धनोडी व घुईखेड केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीड़ा स्पर्धेचे मंगळवारी धनोडी येथील मुकनीराम गांधी महाविद्यालयात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पं. स. चे सभापती किशोर झाड़े, जि. प. सदस्य उमेश केने, पं.स. सदस्य डॉ सतीश देशमुख, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, सरपंच मेश्राम, राऊत, विषय साधनव्यक्ति विवेक राऊत आदी उपस्थित होते. तालुका शैक्षणिक दृष्टया प्रगत होत आहे सर्व शिक्षक गुणवत्तेसाठी धडपडत आहे, गुणवत्ता ही केवळ वर्गा पुरतीच् मर्यादित न ठेवता खेळात ही गुणवत्ता दिसून यावी असे नियोजन शिक्षकांनी करावे असे मत विस्तार अधिकारी अशोक इंगळे यांनी व्यक्त केले. तर टीवी मोबाईल सोडून मैदानी खेळा कड़े लक्ष देण्याचे आवाहन सभापती झाड़े यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख नारायण अतकरे यांनी तर आभार केंद्रप्रमुख कावळे यांनी मानले. यावेळी सुपलवाडा येथील जि.प. शाळेची विद्यार्थिनी काजल बांते हिने निदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घुईखेड व धनोडीच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
via Blogger http://ift.tt/2iEj3BT
from WordPress http://ift.tt/2ihhauo
via IFTTT
No comments:
Post a Comment