Latest News

शिक्षक शिक्षण सक्षमीकरण;प्रतिनियुक्तीने अर्जाबाबत आवाहन

  परभणी /मोईन खान /-:  

ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णय क्रमांक डायट ४५१६/(४०/१६)/ प्रशिक्षण नुसार— DIECPD (DIET) MSCERT  व राज्यस्तरीय संलग्न संस्थांची पुनर्रचना आणि सक्षमीकरण करण्यात येत आहे. यासाठी उपक्रमशील तज्ञ प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांच्याकडून DIECPD (DIET) मध्ये रिक्तपदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी http://ift.tt/2hOFbbk  या लिंकवर online अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी १) जिल्ह्यांतर्गत पदे त्याच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांमधुन भरली जातील. उदा. परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या शिक्षकांना परभणी DIECPD (DIET) मध्येच अर्ज करता येईल. २) ही निवड प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षकांनी online भरलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी निवड केली जाईल. याबाबत संबंधिताना  e-mail द्वारे कळविण्यात येईल. ज्यांची मुलाखतीसाठी निवड केली आहे. त्यांनीच हजर रहावे. ३) online अर्ज मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरता येईल. ४) link वर दिलेल्या रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार विषयांसाठी अर्ज करावेत. ५) अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०१६ ही आहे. ६) ज्या जिल्ह्यात उर्दू विषयाची आवश्यकता आहे त्या जिल्ह्यांसाठी उर्दू विषय शिक्षकांची निवड केली जाईल, असे प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जिंतूर नाका, परभणी यांनी कळविले आहे.

via Blogger http://ift.tt/2impDbM




from WordPress http://ift.tt/2i8Wth1
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.