जळगाव जामोद तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये दि २९ डिसेंबर रोजी शासकीय हमी दरात तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला केंद्र शासनाच्या भाव स्थिरता निधी योजने अंतर्गत किमान आधार भूत किंमत (M.S.P) दरामध्ये एफ . सी . आय . चे वतीने या वर्षी तयार होणाऱ्या तूर खरेदीचा शुभारंभ पणन महासंघ संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद सभापती श्री प्रसेनजीत पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी क्रेंद्रावर सुभाष राठी या शेतकऱ्याची तूर खरेदी करून त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या क्रेंद्रावर तुरीसाठी असलेल्या हमीभाव ४६२५ असणार आहे तर ४२५ रुपये प्रति क्विंटल बोनस असा एकूण ५०५० रुपये दार प्रति क्विंटल राहणार आहे
या वेळी विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक संदीप पैठणकर , संजय नाशिककर , जयप्रकाश तायडे , संजय भुजबळ , शांताराम धोटे , किशोर केला , तसेच सर्व संचालक मंडळ मापारी आणि मायाडी कामगार उपस्थितीत होते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या क्रेंद्रावर आपली तूर विक्रीसाठी आणावी असे आव्हान या वेळी करण्यात आले .
via Blogger http://ift.tt/2iJdX79
from WordPress http://ift.tt/2iJaqpJ
via IFTTT
No comments:
Post a Comment