गडचिरोली –
२३ डिसेंबरला दुपारी १२ वाजता गणवेशधारी नक्षलवाद्यांनी लोह खनिजाची वाहतूक करणारे ६९ ट्रक पेटवले. जिल्ह्यातील सुरजागड पहाडावर गेल्या तीन मासांपासून लोह खनिज उत्खननाचे काम चालू होते. मुंबईतील ‘लायड अॅण्ड मेटल’ या आस्थापनाला सरकारने २००७ मध्ये लीज दिली होती. या प्रकल्पाला नक्षलवाद्यांनी तीव्र विरोध केला होता. काही वर्षांपूर्वी याच पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी या आस्थापनाच्या २ कर्मचार्यांची हत्या केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेऊन चार मासांपूर्वी येथे उत्खनन चालू केले होते.
via Blogger http://ift.tt/2hRZwN6
from WordPress http://ift.tt/2hS4IQQ
via IFTTT
No comments:
Post a Comment