सकल मराठा कुणबी समाज बांधवांनी आज पोलिस आयुक्तांना युवासैनिकांवर दाखल केलेली अँक्ट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी केली अन्यथा मुख्यमंत्र्यां आज समोर आंदोलन करायची चिथावणी दिली आहे त्यामुळेच आज शहरात संध्याकाळी ७ वाजे पासुनच पोलिसांनी शहरभरात बँरेक्टस लावुन ठेवले आहेत. सदर निवेदनात सांगण्यात आले आहे कि महिलेस आमचा मुलांनी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद केला नसताना आमदार रवी राणा व विनोद गुहे यांनी आमच्या समाजाच्या whatsapp व फेसबुक ग्रुप वर सदर महिलेची जबानी व FIR ची कॉपी टाकून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा व कायदा सुव्यवस्था बिगडवण्याचा प्रयत्न केला आहे . कार्यालयात केलेल्या हल्याचे आम्ही समर्थन करित नसून आमदार रवी राणा यांना सदर हल्यातील युवक हे ११ पैकी ८ मराठा कुणबी समाजाचे असल्याची माहिती असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक अट्रासीटी कायदा चा गैरवापर करून पोलिसांना सदर गुन्हे दाखल करण्यास लावले आहेत . या गुन्ह्यांमध्ये सकाळ मराठा कुणबी समाजाचे सर्व श्री ललित राजेंद्र झंझाड (२८ वर्ष मराठा कुणबी ), गजेंद्र पाटेकर (३१ वर्ष मराठा कुणबी) , पराग गुडधे (२९ वर्ष मराठा कुणबी), सागर निबते(२२ वर्ष मराठा कुणबी) , सुमित झंझाड (२६ वर्ष मराठा कुणबी) , रामकृष्ण MATODE (३० वर्ष मराठा कुणबी), व इतर विक्रम राजेंद्र लाड (२४ वर्ष बारी समाज ), तुषार अंभोरे (मातंग समाज २४ वर्ष ) प्रवीण दिधाते २८ वर्ष लिंगायत समाज ) मोहन आखंडे ( सोनार समाज ) निलेश दिपटे ( तेली समाज ) आहेत.
अट्रासीटीकायद्याचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध सकाळ मराठा समाजाचे विरोध करण्याचे धोरण असल्याने याबाबत राजकीय द्वेषापोटी आमदार रवी राणा यांनी स्वत पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून गुन्हे दाखल करून घेतले अशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आहेत.
सदर गुन्हे मागे न घेतल्यास आज मुख्यमंत्रीसमोर आंदोलन करू -असा घणाघाती इशारा सकल मराठा समाजातर्फे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेला आहे
via Blogger http://ift.tt/2ijiwEG
from WordPress http://ift.tt/2istBkj
via IFTTT
No comments:
Post a Comment