माणुसकीचा पुन्हा नवा एक उपक्रम मनं सुखावून गेला. मनाचा निर्धार व कार्याची जाणिव असेल तर समाजासोबतं जगतांना धर्म व जातींचे बंधन पाळणे येथे वर्ज आहे हाच मोलाचा सदभावनेचा संदेश व ब्रिद घेऊन चालतं आलेली माणुसकी . सामाजिक उपक्रमातून निरंतर कार्य करणारी माणुसकी ही फक्त संस्था नव्हे तर हि सामाजिक चळवळ म्हणावी लागेल. याच माणुसकीने मनातं नवे विश्व निर्माण केलयं, रविवार दिवसा बहुदा ख्रिसमस येतोचं परंतु सामाजिक चळवळीने झपाटलेल्यांना दिवस सारखेच,चांदुर रेल्वे शहरातील प्रत्येक शाळेत अनपेक्षितपणे हजेरी लावणारा माणुसकीचा सांताक्लाँज हा प्रत्येक चिमुकल्यांच्या मनातं घर करुन गेला. एखादा उपक्रम राबवायचा म्हटलं कि भक्कम तयारी व व्यवस्थापन लागतचं हा जगाने मान्य केलेला सिध्दांत जरी असला तरी व्यवस्थापनात जिव ओतणारे प्रामुख्याने प्रामाणिक असायला हवे हे नव्याने नमुद करायला भाग पाडणारी हि सर्व टिम म्हणजे “माणुसकी” चि. नकुल राऊत ने वठविलेली सांताक्लाँज ची भुमिका खरचं वाखाळण्याजोगी ठरली. शाळेतील परिक्षा व सामुहिक वातावरणात चिमुकल्यांच्या चेहर्यावर काही क्षणापुरता आनंद हेच माणुसकीचे खरे यश ठरलं. परंतु त्याहुनही महत्वाचे या वेळी या सांताने गिफ्ट खाऊ देवुन चिमुकल्यांना हसवलं हेच नाही तर त्यांना सामाजिक उपक्रमात सहभागी केलय अर्थात माणुसकीचा नित्यक्रमाने चालतं आलेला उपक्रम या वर्षीसुद्धा त्याच जोमाने करण्यात येतं आहे. आपल्या घरातील जुने कपडे, खेळनी, भांडी इत्यादी अश्या विविध वस्तु गोळा करुन समाजातील दुरलक्षित घटकांपर्यंत पोहविण्याचा स्वच्छ व प्रामाणिक उपक्रमाकरीता हा सांता न दमता फिरतं होता. तेव्हा या माणुसकिच्या या उपक्रमात आपण सुध्दा सहभागी होऊया व माणसाला माणसाला माणुसकिने जोडुया।
via Blogger http://ift.tt/2iEo794
from WordPress http://ift.tt/2ihjH7M
via IFTTT
No comments:
Post a Comment