सनातन पंचांग २०१७च्या कन्नड
|
श्रीश्रीश्री (डॉ.) महर्षी आनंद गुरुजी म्हणाले, ‘‘सनातन पंचांगामध्ये हिंदूंना प्रतिदिन करायचे आचरण, संस्कृती, पूजा पद्धती, शुभमुहूर्त, सण, व्रते कशी करायची, राष्ट्र पुरुष, साधुसंत, हिंदुत्वाचे दर्शन, हिंदुधर्म रक्षण, धर्मजागृती आदींची अमूल्य माहिती आहे. हिंदु संस्कृती रक्षण आणि भाषाभिमान वाढवणे, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता आपल्या संस्कृतीचे आचरण केले पाहिजे, या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
सर्वांनी हे अॅण्ड्रॉईड ‘सनातन पंचांग २०१७’ भ्रमणभाषमध्ये विनामूल्य डाऊनलोड करावे’’, असे आवाहन त्यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘गेल्या ४ वर्षांपासून सनातन पंचांग धर्मप्रचार, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण यांच्या उद्देशाने अॅण्ड्रॉईडमध्ये विनामूल्य देण्यात येत आहे. हे केवळ दिनांक बघण्याचे पंचाग नसून सनातन वैदिक धर्माचा शब्दकोश आहे. लोकांना सकाळी उठताच कोणता श्लोक म्हणायचा; स्नान करतांना, आहार ग्रहण करतांना, झोपायच्या आधी कोणता श्लोक म्हणावा ? याविषयी संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. सनातन पंचांग ८ भाषांत उपलब्ध असून लक्षावधी लोक याचा लाभ घेत आहेत. सनातन पंचांगाच्या मुद्रित प्रतीमध्ये असलेल्या सर्व विषयांसह धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षण यांविषयी माहिती देण्यात आली असून वरचेवर पंचांगाच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे संदेश पाठवले जातील.’’
झी कन्नड वाहिनीने सनातन पंचांगाच्या प्रकाशनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात आले.
via Blogger http://ift.tt/2hhp8C9
from WordPress http://ift.tt/2ipup8m
via IFTTT
No comments:
Post a Comment