बेंडोजी बाबा महाविद्यालय येथे ५00 हून जास्त विद्यार्थी असून अद्यापही या शाळेत संगणक नसल्याने येथील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून प्रूर्णत: वंचित असून संस्था चालकाचे याकडे दुर्लक्ष आहे.
घुईखेड हे गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील शहर वजा खेडेवजा गाव असून या शाळेत आजूबाजूच्या दहा-बारा खेड्यातील विद्यार्थी या शाळेत असून येथे अद्यापही संगणक नाही. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्वत: या शाळेची निव ठेवलेली आहे. परंतू येथील शिक्षकांच्या अंतर्गत कलहामुळे शिकविणे कमी व अंतर्गत राजकारण जास्त अशी स्थिती सध्या या शाळेत चालली आहे. हस्तक्षेप जास्त व ज्या कर्मचार्यांचे संस्थाचालकाशी परिचय कमी त्यांना कोणी विचारेणा. अंतर्गत राजकारणामुळे काही शिक्षक कर्मचार्यांचे विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी नावाजलेली, गतवैभव प्राप्त शाळा आता यांच्या अंतर्गत कलहामुळे लयास जात आहे. तेव्हा संस्था चालकांनी या गोष्टीकडे लक्ष्य देऊन विद्यार्थ्यांचे संगणकीय शिक्षणाचे नुकसान होणार नाही, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
via Blogger http://ift.tt/2i1osQm
from WordPress http://ift.tt/2hS5KMX
via IFTTT
No comments:
Post a Comment