Latest News

अचलपृर नगरपालिका उपाध्यक्ष शशीकांत जयस्वाल यांची एकतर्फी निवड -नरेंद्र फिसके,सचिन देशमुख,असलम वंजारा व डाँ राठी बनले स्वीकृत सदस्य


     नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांनी पीठासीन अधिकारी म्हणुन बजावली भुमिका


प्रमोद नैकेले / अचलपूर /–




 नगरपालिका निवडणूकीनंतर पहिली आमसभा संपन्न झाली यामध्ये प्रथमच पीठासीन अधिकारी म्हणुन नगराध्यक्षांनी बजावली भुमिका या सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड पार पडली.

    जनतेतून सरळ निवडून आलेल्या नगराध्यक्ष्या सुनिता नरेंद्र फिसके ढोल ताश्याचे गजरात शिवगणेश मंदिरात आल्या आपल्या असंख्य चाहत्यांसोबत पुजन व महाआरती करून नगराच्या विकासाची शपथ घेउन नगरपालिका सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणुन स्थानापन्न झाल्या.त्यांच्या परवानगीने उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली एकिकडे तीस सदस्यांचे समर्थनाने शशिकांत जयस्वाल तर आठ सदस्यांचे सहकार्याने प्रहारचे संजय तट्टे यांनी नामांकन अर्ज दाखल केले परिसरात अगोदर सुरू असलेल्या प्रहारच्या प्रवीण पाटील ऐवजी संजय तट्टे यांच्या नामांकनाने काहीतरी मोठी खिचडी शिजल्याचे बोलल्या जात होते अर्थात शशिकांत जयस्वाल यांची एकतर्फी निवड नगराध्यक्ष सुनिता नरेंद्र फिसके यांनी विधीवत घोषणा केली त्यांना नगराध्यक्ष मिळवून एकतीस तर संजय तट्टे यांना केवळ आठ मते मिळाली नगराध्यक्ष ह्या एकोणवीसाव्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या त्या जागेचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सभागृहात एकोणचाळीस ऐवजी अडतीस नगरसेवक उपस्थीत होते.स्वीकृत सदस्य म्हणुन शहर विकास आघाडीचे नरेंद्र फिसके,भाजपचे सचिन देशमुख,काँग्रेसचे असलम वंजारा तर प्रहारचे डाँ.शरद राठी यांची निवड करण्यात आली.सर्वांनी नवनियुक्त उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांचे अभिनंदन व स्वागत केले नव्या दमाचे व युवाशक्ती या सभागृहात या निवडणूकीत असल्याने जनतेची शहराच्या विकासाची ब-याच वर्षानंतर इच्छा पूर्णत्वास जाण्याची महत्वाकांक्षा वाढल्याचे जनतेच्या चर्चेतून व उत्साहातून दिसत होते.

via Blogger http://ift.tt/2iGAphf




from WordPress http://ift.tt/2isJAi8
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.