परभणी /-
: परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता अॅप डॉउनलोड करा व आपल्या शहराचा नंबर 1 बनवा. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 2017 मध्ये आपल्या शहराला जास्तीत जास्त गुण मिळविण्याकरिता सहकार्य करा. शहरातील स्वच्छता करिता अॅप डाउनलोड करा. आपल्या कॉलनीमध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडी नाही आल्यस तसेच आपल्या परिसरात कुठेही स्वच्छता होत नसेल तर त्या ठिकाणचा फोटो काढून पाठवावा असे आवाहन शहरातील एनजीओ, नागरिक यांना करण्यात येत आहे. घाणीचा फोटो मोबाइलव्दारे काढून स्वच्दता अॅपवर अपलोड करा. या संदर्भात महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उपायुक्त अनिल गिते, सहाय्यक आयुक्त विजया घाडगे व संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता एनजीओची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये प्रोजेक्टरव्दारे माहिती देण्यात आली. आयुक्त राहुल रेखावार यांनी शहरातील नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करावा व कचरा घंटागाडीत टाकावा. रस्त्यावर किंवा नालीत टाकू नये. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपला एक सकारात्मक प्रयत्नही घडवेल विकास. स्वच्छता अॅप डाउनलोड करा व स्वच्छाग्रही बना. सहाय्यक आयुक्त विजया घाडगे यांनी शहरातील नागरिकांना भारता सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सब्सिडी मिळवा व घरात शौचालय बनाव. सब्सिडीसाठी कॉल करा स्वच्छता हेल्पलाईन 1969 किंवा नेहमी सार्वजनिक शौचालयाचा वापर करा. शौचालयाची सवय पक्की, तीच खरी प्रगती… स्वच्छ सुंदर मंगलाची नित्य हो आराधना…. करूया संकल्प नव्या वर्षाचा… स्वच्छ व सुंदर परभणीचा…
परभणी शहरामध्ये स्वच्छता महाराष्ट्र अभियानांतर्गत शासकीय अधिकारी नागेश जोशी स्व्च्छता निरीक्षक करण गायकवाड, सुनिल वसमतकर, अशोक स्वामी, मेराज अहेमद, के.बी. हैबती, राजू झोडपे यांनी शहरातील नागरिकांना स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत. शहरामध्ये शौचालय बांधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सब्सिडी मिळवा व घरात शौचालय बनवा. आई बाबा सांगू कशी.. शौचास जायची वाटते भिती… यासाठी शौचालय बांधण्यात यावेत.
स्वच्छता अॅप डाऊनलोड करून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या परिसरातील स्चछतेविषयीचे फोटो काढून अपलोड करावेत असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजीज कारचे यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2hS1PzQ
from WordPress http://ift.tt/2ibkB2F
via IFTTT
No comments:
Post a Comment