Latest News

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकर्‍यांना आवाहन अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१६

 मोईन खान / परभणी /- – 
Image result for प्रधानमंत्री पीक विमा योजना

रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत आहे.                                                                                                      

     ही योजना सर्व शेतकर्‍यांना लागु असून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना बंधनकारक आहे. कर्ज न घेणार्‍या शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक स्वरुपाची आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिक, विमा संरक्षीत रक्कमः- गहु बागायत- विमा संरक्षीत रक्कम (प्रती हेक्टर) ३३,००० रुपये, ज्वारी जिरायत- २४,००० रुपये, हरभरा २४,०००रुपये, करडई २२,००० रुपये, उन्हाळी भूईमुंग ३६,००० रुपये. या योजनेत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. रब्बी हंगामामध्ये शेतकर्‍यांनी भरावयाचा प्रति हेक्टर विमा हप्ता दर याप्रमाणे अन्नधान्य व गळीतधान्य पीके विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के. या योजनेतर्ंगत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रती हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समाजण्यात येईल आणि हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.

   प्रधानमंत्री विमा योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत सर्व अधिसूचित पीकांकरिता ३१ डिसेंबर २०१६ अशी आहे या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी योजनेत सहभागी व्हावे.

योजनेची उद्दिष्ट्ये

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.

via Blogger http://ift.tt/2hPbPqF




from WordPress http://ift.tt/2isx3eB
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.