दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेवून जाताना दोघांना पकडण्यात आले आहे. परभणी शहरात 28 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी दिली.
वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल निलेश विलास कांबळे बुधवारी कर्तव्यावर होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारा विनाक्रमांकाच्या दुचाकीवर दोघेजण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वसमतकडे जात होते. संशय आल्याने परभणीतील वसमत रोडवरील बी. रघुनाथ हॉलजवळ कांबळे यांनी या दुचाकीला थांबवून चौकशी केली. त्यांच्याजवळ 25 किलो वजनाचे जिलेटीन आणि 200 डिटोनेटर असे ज्वलनशील पदार्थ सापडले. दोघांना वाहनासह ताब्यात नवामोंढा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पोलिस कर्मचारी कांबळे यांच्या फिर्यादीवरून केदार कन्हया नेवाडा (रा. माळीखेडा, राज्यस्थान) आणि मछिंद्र मुंजाजी इंगोले (रा.धर्मापुरी, ता.जि. परभणी) यांच्याविरूद्ध भारतीय स्फोटक कायाद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार जाधवर अधिक तपास करीत आहेत.
via Blogger http://ift.tt/2hPpmyc
from WordPress http://ift.tt/2hv2arh
via IFTTT
No comments:
Post a Comment