माणसाला मानवाच्या पातळीवर आणून सर्व मानव जातीविषयी सद्भावना जागृत ठेवून माणसाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचा मूलमंत्र देत खर्या धर्माची शिकवण देणारे संत काशिबा महाराज हे मानवतावादी विद्यापीठाचे खरे कुलगुरु होते असे मत प्रभावती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजा पुजारी यांनी व बालासाहेब वाघमारे यांनी व्यक्त केले.
परभणी शहरातील जलतरिणका संकुलातील दैनिक श्रमिक एकजूट कार्यालयात परभणी जिल्हा गुरव समाजाच्यावतीने आयोजित काशिबा महाराज पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, जगाला प्रेम अर्पणारा धर्म हाच श्रेष्ठ धर्म असतो. देव रंजल्या गांजल्यात असतो. त्याची सेवा हीच ईश्वराची सेवा असते. देवाची भिती न बाळगता त्याच्याबद्दल आदर आणि संकटमोचन या भावनेतूनच मानवाने त्याची आराधना केली पाहिजे. जगवितो तो व जागवतो तो धर्म ही धर्माविषयीची काशिबा महाराजांची व्याख्या होती. सर्व समाज एका आनंदाच्या पातळीवर येऊन जगला पाहिजे, यासाठी त्यांनी हयातभर कार्य केले. देव हा मारक नसून तारक असतो. त्यामुळे त्याच्याविषयी भिती वाटता कामा नये. तो कोणाचेही वाईट करत नाही. ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या वाईटाचे धनी असतात आणि त्यानुसारच सर्वकांही घडत असते. त्यामुळे सत्कर्म करा! आणि नीट जगा अशी शिकवण काशिबा महाराजांनी तमाम समाजाला दिली. असेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला वसंतराव वाघमारे, विनायकराव पाटील, बालासाहेब वाघमारे, रामदास पाटील, बाजीराव पाटील, महेश बेलबादकर, गोपाळ चौथाईवाले, गणेश दिक्षीत, गजानन वाघमारे, राजकुमार हट्टेकर, वसंतराव वाघमारे, बी.आर.पाटील, संदीप वाघमारे, डी.एल.डोंगरे, नंदन टेहरे, विजय कदम आदी उपस्थित होते. प्रारंभी पिंगळी येथील माधवराव नानईकवाडे यांच्या पत्नी विजया नाईकवाडे यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजकुमार हट्टेकर यांनी केले तर आभार संदीप वाघमारे यांनी मानले.
via Blogger http://ift.tt/2iboVPi
from WordPress http://ift.tt/2i3LYON
via IFTTT
No comments:
Post a Comment