मुंबई – नवरात्र, गणेशोत्सव आदी उत्सव ठराविक कालावधीकरिता असतात; मात्र मशिदींवरील भोंगे वर्षाचे १२ महिने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे प्रतिदिन उल्लंघन करतात, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयास सादर केलेल्या शपथपत्रात २३ डिसेंबरला दिली. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी होणार्या कार्यक्रमांच्या आवाजाची पातळी तपासण्यासाठी उपलब्ध डेसीबल मीटर्स वापरले जातील. आवाजाच्या पातळीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करू, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील संतोष पाचलग यांची याचिका आणि या संदर्भातील तीन अवमान याचिका यांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. याप्रसंगी शासनाच्या वतीने त्यांच्या अधिवक्त्यांनी म्हणणे मांडले.
via Blogger http://ift.tt/2hV63qi
from WordPress http://ift.tt/2i6eTBW
via IFTTT
No comments:
Post a Comment