उरण (रायगड)–
आपल्या देशात देवतांची सर्रास विटंबना होते. मंदिरांचे सरकारीकरण होते. मंदिरांची संपत्ती लुटली जाते, भूमी हडप केल्या जातात. रस्ता रुंदीकरणात मंदिर आले, तर तोडले जाते; पण मशीद आली, तर तिला हात लावला जात नाही. हिंदूंचे सण-उत्सव बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंच्या यात्रेला, कुंभमेळ्याला कर लावला जातो, तर हज यात्रेला ८२६ कोटी अनुदान दिले जाते. हिंदूंना कायदे, तर अन्य धर्मियांना फायदे हेच सरकारी धोरण आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी दादर गाव (तालुका पेण) येथे आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत केले.
येथील संतोषीमाता मंदिर सभागृहात २९ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फ्लेक्सप्रदर्शन लावण्यात आले होते. सभेला गावातील २०० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.
या सभेला सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी हिंदु संस्कृतीचे महत्त्व विषद केले. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि हिंदूंनी धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले.
via Blogger http://ift.tt/2ihoshi
from WordPress http://ift.tt/2ihADdY
via IFTTT
No comments:
Post a Comment