स्थानिक रामदेवबाबा भक्त परिवारातर्फे भारूका मातृसेवा मंदिरात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 75 रक्तदात्यानी रक्तदान केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपले समाज कार्यापासून दूर जात आहे. पण अशातही समाजातील लोकांनाचे देणे म्हणून रामदेवबाबा भक्त परिवार शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच करत असते. या युगात माणसाने खूप काही प्रगती केली तरी पण तो देवाने दिलेल्या या जादूवर मात करून शकला नाही. आज विज्ञानाच्या सह्याने प्रत्येक गोष्ट शक्य झाली आहे पण रक्त बनविन्या ईतके प्रगत विज्ञान ही झाले नाही. ही जादू फक्त देवाने मनुष्याला दिली आहे म्हणून रक्तदान करने या भूमिवरील सर्वात श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते. याच अनुषंगाने रामदेवबाबा भक्त परीवारातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अशोक काॅलेजचे प्राध्यापक प्रशांत ठाकरे यांनी आज पर्यंत 39 वेळा रक्तदान केले. व या शिबिरात त्यांनी आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह 40 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला. शहरातील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराला सहकार्य केले. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख या वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रध्दा लढळ, हारिस खान, साहेबराव अमाबंदे, प्रक्षा दिवे हि रक्तपेढीच्या डॉक्टरांची टिम या वेळी उपस्थित होती.
via Blogger http://ift.tt/2hs2TGu
from WordPress http://ift.tt/2iIku20
via IFTTT
No comments:
Post a Comment