नाशिक – आपली संस्कृती जोपासणे आणि तिचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे जन्मजात कर्तव्य आहे. ते प्रत्येक हिंदूने पार पाडावे, तसेच हिंदु नववर्षारंभ हा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे साजरा करावा, असे आवाहन करणारी एक जनप्रबोधन फेरी येथील सिडको भागात २४ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली होती. जनप्रबोधन फेरीचा प्रारंभ मोरवाडी येथील श्री साई मंदिर येथून सनातनचे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून झाला, तर फेरीची सांगता त्रिमूर्ती चौकमधील श्री दुर्गा मातामंदिर येथे झाली. या प्रबोधनफेरीत पाटीलनगर येथील श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय, पवननगरमधील जनता विद्यालय, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माध्यामिक विद्यामंदिर, हिंदी प्राथमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय या शाळांमधील २४ शिक्षक आणि ५५० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच योग वेदांत समितीचे श्री. काकाजी आणि त्यांचेे साधक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी, रणरागिणी शाखेच्या सौ. वैशाली कातकाडे आणि सनातन संस्थेचे साधक असे एकूण ६०० जण सहभागी झाले होते.
पवननगर येथील के.बी.एच्. विद्यालय आणि आर्.बी.एच्. विद्यालय या शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळेच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून घोषणा देत फेरीचे स्वागत केले.
पवननगर येथील के.बी.एच्. विद्यालय आणि आर्.बी.एच्. विद्यालय या शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळेच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून घोषणा देत फेरीचे स्वागत केले.
via Blogger http://ift.tt/2hDqbKD
from WordPress http://ift.tt/2isp14A
via IFTTT
No comments:
Post a Comment