मानवाची निर्मिति ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसऱ्या गरजु मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे.
मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. त्यामुळे उद्या शनिवारी शहरातील रामदेवबाबाबा भक्त परीवारातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबीराचे आयोजन स्थानिक धनराज नगरातील भारूका मातृसेवा मंदिर येथे सकाळी ८ ते १२ वाजता पर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे या रक्तदान शिबीरात रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन रामदेवबाबा भक्त परीवार, चांदुर रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
via Blogger http://ift.tt/2i1mj9z
from WordPress http://ift.tt/2hfpTf9
via IFTTT
No comments:
Post a Comment