Latest News

नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा न.प. कर्मचाऱ्यांकडुन सत्कार – सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )


चांदुर रेल्वे नगर परीषदेची सार्वत्रिक निवडणुक २७ नोव्हेंबर रोजी होवून आठ प्रभागातुन १७ नगरसेवक व नगराध्यक्षाची थेट जनतेतुन निवड करण्यात आली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे निलेश उर्फ शिट्टू सुर्यवंशी निवडुन आले तर नगरसेवकपदासाठी कॉंग्रेसचे १०, भाजपचे ५ व अपक्ष २ नगरसेवक निवडून आले. 

            शासनाच्या नियमाप्रमाणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी बुधवारी अध्यक्षपदावर पदारूढ झाले. त्यावेळी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी सर्वच नगरसेवक सभागृहात हजर होते. या प्रसंगाचे औचित्य साधून स्थानिक नगर परीषद कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यालयीन निरीक्षक धनराज गजभिये यांच्या नेतृत्वात नवनिर्वाचित नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, नगरसेवक व स्वीकृत सदस्यांचा यथोचित सत्कार केला.
      यावेळी नगर परीषदेच्या सर्वच विभागाचे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी प्रामुख़्याने उपस्थित होते.

via Blogger http://ift.tt/2ih2sRq




from WordPress http://ift.tt/2hs8w7G
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.