Latest News

धामणगावात 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार बुक डेपो संचालकाला अटक महिलांनी दिला आरोपीला चोप

धामणगाव रेल्वे:-  (शहेजाद खान)-

येथील एका बुक डेपो संचालकाने तीन वर्षीय बलिकेवर बलात्कार केल्याची घटना आज दुपारी शहरात घडली दरम्यान महिलांनी या नाराधमास चोप दिला. दत्तापूर पोलीसानी सदर नराधमा विरुद्ध पास्को कायद्या अंतर्गत  गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

     
 या घटनेतील आरोपीचे नाव सुनील महादेव सव्वालाखे वय 50 वर्ष रा. नारायण नगर अमरावती असे आहे. सुनील हा धामणगाव शहरातील शिवाजी वार्डात प्रसन्न बुक  डेपो चालवितो या बुक डेपोत आज दुपारी 1.30 वाजता दरम्यान 3 वर्षीय चिमुकलीला चॉकलेट चे आमिष दाखवून दुकानाचे आतमध्ये बोलविले व अश्लील चाळे केले सदर चिमुकलीने आपबीती आपल्या  आईजवळ सांगितली शेजारच्या महिलांनी हि गंभीर बाब कळताच सुनीलला त्यांनी चांगलाच चोप दिला त्यानंतर दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात दिले सदर चिमुकलीच्या पाल्याच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलीस यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 2012 प्रमाणे 376 अ  दाखल केला या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती मालते करीत आहे.
      आरोपी सुनील सव्वालाखे याने यापूर्वीही लहान मुलींशी असाच घृनीत प्रकार केल्याची चर्चा आहेत. मुलींनी बुक पेन तसेच इतर शैक्षनिक साहित्य देऊन दुकानाच्या आत बोलावून अश्लील चाळे करणे अशा घटना घडल्या असल्याचे चर्चा परिसरात आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सुनील सव्वालाखे याला उद्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. शैक्षनिक साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी नेहमी या बुक डेपोत येत असत असा घृणीत प्रकार अधिक काही विध्याथना केलात काय? या विषयी दत्तापूर  पोलीस तपास करीत आहे. सदर घृणास्पद घटनेची सर्व स्तरावरून चीड व्यक्त केल्या जात आहे

via Blogger http://ift.tt/2iJ8A89




from WordPress http://ift.tt/2hsZYO0
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.