Latest News

राजमाता पब्लिक स्कुल आसेगांव येथे ख्रीसमस मोठ्या उत्साहाने संपन्न



अचलपूर:-/प्रमोद नैकेले /–



 नाताळ म्हणजे उत्साहाचा सण यादिवशी नाताळबाबा येतात व झींगल बेल हे गीत गात आपल्या लाडक्या बालकांना खेळणी व भेटवस्तू देऊन जातात अशी संकल्पना आहे याअनुशंघाने सर्वत्र नाताळ उत्साहाने साजरा करण्यात येतो.
      अश्याप्रकारे नजीकच्या आसेंगावपुर्णा येथील  राजमाता पब्लिक स्कुल येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला ही शाळा कृतीतून शिक्षण पध्दतीने चालणारी शाळा आहे.नाताळ निमित्ताने छोट्या बालकांनी येशूख्रीस्त व नाताळबाबा यांची आकर्षक वेशभूषा करून प्रेक्षकांचे लक्ष आपल्या कडे आकर्षित करून घेतले यामध्ये नाताळ बाबा चित्रांशी आखरे,अद्वैत परचाके,प्रतीक देशमुख,उन्नती गोंडाणे,शर्वरी इंगळे व प्रथमेश इंगळे मदरमेरी व येशु परचाके दांपत्य यांनी साकार केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटेमँडम,प्रमुख अतिथी अविनाश मार्डीकर सभापती महापालिका,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गोटे,आखरेमँडम व ठानेदार अजय आखरे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी करण्यासाठी निता खडसे,प्रीती इंगळे व प्रितम इंगळे यांनी सहकार्य केले.

via Blogger http://ift.tt/2iztgLP




from WordPress http://ift.tt/2impoyb
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.