अंबरनाथ –
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस हिंदूंच्या स्मरणात रहातात आणि ते त्या दिवसांचे महत्त्वही सांगतात; मात्र गुढीपाडव्याच्या संदर्भात विचारल्यावर त्यांना काहीच सांगता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच लव्ह जिहादच्या माध्यमातून महिलांवरील होणार्या अत्याचारांच्या विरोधात स्त्रियांनी जागृत होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. उमा कदम यांनी केले. कानसई गावामध्ये ३१ डिसेंबरनिमित्त प्रबोधन आणि महिला शौर्य जागरण यांच्या अनुषंगाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा लाभ ३० धर्माभिमानी महिलांनी घेतला.
क्षणचित्रे :
१. धर्मशिक्षणवर्गात येणार्या सौ. सिंधू टाकळकर यांनी त्यांच्या संदर्भात घडलेला अत्याचाराचा एक प्रसंग सांगितला. त्यातून शिकून उपस्थित महिलांनाही आपण प्रतिकार करू शकतो, असे वाटले.
२. या कार्यक्रमाचे आयोजन, प्रसार-प्रचार आणि सिद्धता धर्मशिक्षणवर्गात येणार्या महिलांनीच केली.
३. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
via Blogger http://ift.tt/2hxOyeQ
from WordPress http://ift.tt/2iKOqKV
via IFTTT
No comments:
Post a Comment