अमरावती –
ख्रिस्ती नववर्षोत्सवानिमित्त ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार थांबवावेत, यासाठी येथील पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नीलेश टवलारे, सौ. स्मिता ठाकरे, श्री. श्याम सांगूनवेढे, श्री. योगेश भागवतकर, श्री. संजय चौधरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, आम्ही या वेळी विनाअनुमती कोणतेही कार्यक्रम चालू देणार नाही. तुम्हाला कोठेही अपप्रकार होतांना आढळल्यास तुम्ही आम्हाला सांगा. अन्य वेळीही हिंदुत्वनिष्ठांना चुकीचे काही जाणवल्यास ते आम्हाला सांगू शकतात.
via Blogger http://ift.tt/2hicQLz
from WordPress http://ift.tt/2hYymBW
via IFTTT
No comments:
Post a Comment