Latest News

पैशाच्या बळावर अवैधरित्या कार्यक्रम पार पाडण्याचे सनबर्न हे उत्तम उदाहरण ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

pune_sunburn
सनबर्नच्या आयोजकांनी गोवा सरकारचे ९ कोटी रुपये थकवले असूनही जिल्हा प्रशासनाने सनबर्नच्या आयोजकांकडून केवळ ७५ लक्ष रुपये डिपॉझिट (अनामत रक्कम) म्हणून घेतले आहेत. जे आयोजक ९ कोटी रुपयांचा कर बुडवतात, त्या आयोजकांकडून इतक्या अल्प रकमेचे डिपॉझिट का घेतले जात आहे ? धनदांडग्यांच्या पाठीशी सरकार आणि प्रशासन असल्यावर नियमांचे उल्लंघन करूनही कार्यक्रम कसे पार पाडले जाऊ शकतात, याचे सनबर्न हे उदाहरण आहे.
१. आयोजकांकडे अद्याप आवश्यक त्या सर्व अनुमत्या मिळाल्या नसतांनाही कार्यक्रम होऊ दिला जात आहे. सनबर्नच्या संकेतस्थळावर आफ्टर डार्क या कार्यक्रमांचे रात्री १०.३० नंतरही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उघड दारूविक्री होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी कायदाबाह्य गोष्टी होतांना आढळल्यास त्यावर कारवाई करू, असे सांगणारे सरकार त्या ठिकाणी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह विरुद्धची मोहीम राबवणार आहे का ?
२. काळ्या धनाविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून ५० सहस्रांहून अधिक रकमेची तिकिटे खरेदी करणार्‍यांची सरकार चौकशी करणार का ?

via Blogger http://ift.tt/2ijgWTw




from WordPress http://ift.tt/2ig8otR
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.