चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान) –
व्यसनाधीन नातवाने फक्त 200 रुपयाच्या मागणीसाठी चक्क वयोवृद्ध आजोबालाच गळफास लाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चांदुर रेल्वे पासुन १७ कि. मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे शनिवारी घडली.
आरोपी सुदर्शन अशोक पावसे )वय 29 वर्ष) याला दारूचे व्यसन असून शनिवारी सकाळी तो आपले आजोबा कृष्णा जानोजी पावसे (वय 82 वर्ष) रा. घुईखेड यांचे घरी गेला व 200 रुपयाची मागणी आजोबाला केली. मात्र त्यांनी नकार देताच वाद घालून शेल्याचा गळफास करून वयोवृद्ध आजोबा कृष्णा जानोजी पावसे यांचे गळ्यात टाकून आवळण्याचा प्रयत्न केला असता कृष्णा पावसे यांनी आरडा ओरड केली. vidarbha24news तेव्हा शेजारील नागरिकांनी धावत येऊन त्यांचा जीव वाचविला परंतु सुदर्शन पावसे याने घटनास्थळावरून पळ काढला. सदरची माहिती तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला मिळताच आरोपी सुदर्शन पावसे याला अटक करून त्याच्या विरुद्ध कलम 452, 307 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो. उपनिरीक्षक शिवाजी राठोड करीत आहे.
via Blogger http://ift.tt/2hVa1z8
from WordPress http://ift.tt/2ieBBoP
via IFTTT
No comments:
Post a Comment