या देशात अवैध असलेली केवळ हिंदूंचीच मंदिरे पाडली जातात; मात्र अवैध मशिदी किंवा चर्च पाडली जात नाहीत. हिंदूंचा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांमध्ये रात्री विलंबापर्यंत ध्वनीक्षेपक लावले; म्हणून पोलीस गुन्हे प्रविष्ट करतात. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन हिंदूंची अवैध मंदिरे पाडली जातात; पण उच्च न्यायालयाचा आदेश असतांना एकाही मशिदीवरील भोंग्यावर कारवाई केली जात नाही. उलट हेच सरकार मुंबई उच्च न्यायालयात ‘आम्ही मशिदींवरील एकाही भोंग्यांवर कारवाई केली नाही’, असे प्रतिज्ञापत्र सादर करते. याचसमवेत जिहादी आतंकवादी आणि फुटीरतावादी यांना शासन आर्थिक साहाय्य करते, हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. देशासाठी प्राण देणारे भगतसिंह यांना ‘आतंकवादी’ ठरवले जाते, तर हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपू सुलतानचा मात्र उदोउदो केला जातो. यातून एकच दिसून येते की, हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांचे फायदे, हे आणखी किती काळ सहन करणार ?
via Blogger http://ift.tt/2i93nDA
from WordPress http://ift.tt/2ixkwKe
via IFTTT
No comments:
Post a Comment