सन २०१७ या वर्षाकरीता प्राप्त अधिकारानुसार परभणी जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जाहीर केल्या आहेत. उर्स दर्गाह सय्यद तुराबुल हक्क- गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१७, ज्येष्ठा गौरी पुजन- बुधवार दि. ३० ऑगस्ट २०१७, खंडोबा यात्रा (चंपाषष्ठी) शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०१७ या तीन सुट्ट्या परभणी जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागु राहतील. ही अधिसुचना परभणी जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागु होणार नाही, असे जिल्हाधिकारी, राहुल रंजन महिवाल यांनी कळविले आहे.
via Blogger http://ift.tt/2i1mC4e
from WordPress http://ift.tt/2imBIxG
via IFTTT
No comments:
Post a Comment