चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, भारत कृषक समाज आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती या सारख्या ख्यातनाम संस्थाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्य शहरातील बापूसाहेब देशमुख कन्या शाळा व मन्नालाल गुप्ता विद्यालय यांच्यावतीने मंगळवारी सकाळी भव्य रैलीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या फ़ोटो चे पूजन करूण अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संपुर्ण शहरातुन भव्य रैलीेचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीमध्ये विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, रानी लक्ष्मीबाई ,गाडगे महाराज यांची वेशभूषा धारण करून शहरवासीयांना मंत्रमुग्ध केले.
तसेच रैलीदरम्यान विद्यार्थी पंजाबराव देशमुख की जय, भाऊसाहेब देशमुख अमर रहे असे नारे देत होते. रैलीमध्ये विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूसाहेब देशमुख कन्या शाळा व मन्नालाल गुप्ता विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.
via Blogger http://ift.tt/2imne1O
from WordPress http://ift.tt/2imrzC3
via IFTTT
No comments:
Post a Comment