सनबर्नविरोधी बैठकीत उपस्थित शिवसैनिक |
पुणे– धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे. सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल, तर शिवसेना पद्धतीने हा कार्यक्रम बंद पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसैनिकांनी दिली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी लोणीकंद येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा फेस्टिव्हल महाराष्ट्रातच नाही, तर भारतात अन्यत्र कुठेही होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी दिली. या प्रसंगी ७३ शिवसैनिक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांसमवेत स्थानिक ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांची २५ डिसेंबर या दिवशी खुली चर्चा आयोजित करावी. कार्यक्रमाच्या अनुमतीपत्राविषयी याप्रसंगी चर्चा ठेवावी अन्यथा २६ डिसेंबर या दिवशी शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल, असे श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी सांगितले.
#sunburnfestival
via Blogger http://ift.tt/2hbJxIM
from WordPress http://ift.tt/2i2LNAI
via IFTTT
No comments:
Post a Comment