Latest News

सनबर्न फेस्टिव्हलला शासनाने अनुमती नाकारावी ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

श्री. शरद पोंक्षे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अजय केळकर
     सांगली– सनबर्न फेस्टिव्हल गतवर्षीपर्यंत गोवा येथे होत होता; मात्र या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात अपप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यावर गोवा शासनाने त्याला अनुमती नाकारली. मुळात ज्या प्रकाराचा भारतीय संस्कृतीशी संबंध नाही, असे प्रकार महाराष्ट्रात घेण्याची आवश्यकता काय ? हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का लावणारा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती हनन करणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला शासनाने अनुमती नाकारावी, अशी मी शासनाकडे मागणी करतो. या फेस्टिव्हलला अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि मी, असे आम्ही तिघे केसनंदला भेट देणार आहोत. त्या वेळी आम्ही शासनाला याविषयी पत्र देणार आहोत, असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. श्री. शरद पोंक्षे हे हे राम नथुराम या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने सांगली शहरात आले होते.
     त्या वेळी दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. अजय केळकर यांनी त्यांची भेट घेऊन सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने वैध मार्गाने राबवलेल्या अभियानाची माहिती दिली. त्या वेळी श्री. पोंक्षे यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते. श्री. पोंक्षे यांना समितीच्या वतीने निवेदनही देण्यात आले. 
असे फेस्टिव्हल महाराष्ट्रात झाल्यास तरुण पिढीची हानी होईल !

      श्री. पोंक्षे पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या फेस्टिव्हलमध्ये गुटखा, तसेच अमली पदार्थ यांचे सेवन केले जाते. पुण्यासारख्या पुण्यनगरीत असा फेस्टिव्हल होणे अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारचे फेस्टिव्हल महाराष्ट्रात झाल्यास तरुण पिढीची हानी होईल. असे फेस्टिव्हल हे भारतीय संस्कृतीला कधीच मान्य होणार नाहीत. त्यामुळे अशा फेस्टिव्हलला अनुमतीच देण्याची आवश्यकता नाही. याला सर्वच स्तरांतून विरोध होणे आवश्यक आहे. 

via Blogger http://ift.tt/2hNH9c3




from WordPress http://ift.tt/2hYyxNQ
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.