Latest News

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्तच्या भव्य वाहनफेरीतून दर्शवली गेली हिंदु राष्ट्राकडे घोडदौड !

७०० हून अधिक वाहनांसह १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !

      जळगाव – हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् अशा गगन भेदून टाकणार्‍या घोषणा अन् भगवे ध्वज यांमुळे भगवी झालेली जळगावनगरी, तसेच २५ डिसेंबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काढलेल्या ऐतिहासिक भव्य वाहनफेरीने जळगावनगरीचे वातावरण दुमदुमून गेले. या वाहनफेरीमध्ये ७०० हून अधिक दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आणि १ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभागी होऊन हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. 
     

      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथे भव्य अशा वाहनफेरीला २२ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता शंखनादाने प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर धर्मध्वजाचे पूजन जळगावनगरी ग्रामदैवताचे गादीपती ह.भ.प. मंगेशमहाराज जोशी यांनी केले, तर सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. धर्मध्वज पूजनाचे पौरोहित्य श्री. योगेश्‍वर जोशीगुरुजी यांनी केले.      खानदेश सेंट्रल मैदान येथून प्रारंभ झालेली वाहनफेरी शहरातील विविध प्रमुख चौकांतून मार्गस्थ होत तिची सांगता सभेच्या शिवतीर्थ मैदानावर करण्यात आली. 
     वाहनफेरीमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील विविध १५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्माभिमानी हे उर्त्स्फूतपणे भगवे ध्वज, भगवे फेटे आणि पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. तसेच फेरीमध्ये युवक, युवती, बालधर्माभिमानी आणि वयस्कर यांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीच्या मार्गावर भाजपचे आमदार श्री. राजूमामा भोळे, भाजयुमोचे श्री. नीलेश पवार यांसह अन्य धर्माभिमान्यांनी ८ हून अधिक ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी केली. 
     वाहनफेरीची सांगता शिवतीर्थ मैदानात झाल्यावर सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर, हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी, समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित करत हिंदु धर्मजागृती सभेला येण्याचे आवाहन केले. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर आमदार श्री. राजूमामा भोळे, बाराबलुतेदार समाज आणि नाभिक महासंघाचे श्री. राजकुमार गवळी आणि वरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

क्षणचित्रे
१. अनेक युवक दुचाकीने आणि भगवा ध्वज घेऊन वाहनफेरी चालू असतांना त्यात गटागटाने सहभागी होत होते.

२. अनेक ठिकाणी नागरिक आणि महाविद्यालयीन युवक थांबून कुतूहलाने वाहनफेरी पहात होते. 
३. काही ठिकाणी नागरिक आणि युवक स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये वाहनफेरीचे चित्रीकरण करत होते. 
४. फेरीच्या मार्गावरून शाळेत जाणारे लहान विद्यार्थी उत्साहाने फेरीकडे पाहून जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा देत होेते. 
५. फेरीत सहभागी झालेल्या एका धर्माभिमान्यांच्या खांद्यावर त्यांनी पाळलेला पोपट हा पक्षीदेखील पूर्णवेळ सहभागी झाला होता. 

वैशिष्ट्यपूर्ण

१. धामणगाव, आवार, नांद्रा, कानळदा या गावांतील ४० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. 
२. अकोला येथील पोलीस हवालदार श्री. वैभव मळकंटेवार यांना शरीरसौष्ठव स्पर्धेत जळगाव श्री किताब मिळावल्याविषयी सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
३. शिवसेना महिला आघाडीच्या सौ. मंगला बारी यांच्या हाताचा अस्थिभंग झालेला असतांनाही त्या फेरीमध्ये सहभागी झाल्या. 

जळगाववासियांच्या प्रतिक्रिया !

१. फेरी पाहून आम्हास गर्व वाटतो. आम्ही सभेला नक्की येऊ. 
२. अशा प्रकारच्या सभा आणि फेर्‍या पश्‍चिम बंगालमध्येही झाल्या पाहिजेत. तेथे याची अधिक आवश्यकता आहे. 
३. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करतांना सांगितले की, हिंदु जनजागृती समितीच्या नियोजनामुळे फेरी शिस्तबद्ध झाली. समितीच्या स्वयंसेवकांमुळे आमचा ६० टक्के भार हलका झाला. तुमचे कार्यक्रम नेहमीच शिस्तबद्ध असतात, याचा आम्हाला अनुभव आहे. 

फेरीमध्ये सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटना

      शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, भाजप, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, स्वराज्य निर्माण सेना, नाभिक महासंघ, बारा बलुतेदार संघटना, जय भवानी ग्रुप, जय मातादी ग्रुप, मी मराठी प्रतिष्ठान, स्वराज्य ग्रुप, हुप ग्रुप, योग वेदांत समिती, महर्षि वाल्मिक मित्र मंडळ, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था. 
वाहनफेरीचे फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात आले. त्याची लिंक २० सहस्र लोकांपर्यंत पोचली. ५ सहस्र १६३ जणांनी हे प्रक्षेपण पाहिले. 

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती

सभेच्या प्रसारानिमित्त आज बैठक 
स्थळ  आचार्य हॉस्पिटल, नेहरू चौक, जळगाव. 
वेळ  सायंकाळी ६.३० वाजता.

via Blogger http://ift.tt/2h7IM02




from WordPress http://ift.tt/2heIIiz
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.