मुंबई – अरबी समुद्रात बांधण्यात येणार्या शिवस्मारकासाठी नद्यांचे पाणी आणण्यात येणार आहे. जिवंतपणी महाराजांना वैदिक अधिकार नाकारणार्यांचा हा वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या भव्य शिवस्मारकाचे उद्घाटन २४ डिसेंबरला होणार आहे.
त्यांनी म्हटले आहे –
१. अरबी समुद्रात अश्वारूढ पुतळा उभारण्यापेक्षा सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची देखभाल करणे सोपे असल्याने तो उभारण्यात यावा. घोड्यावरचे शिल्प केवळ युद्धजन्य अवस्था प्रदर्शित करते. ही शिल्पे स्फूर्तीदायक असतात, परंतु समृद्धी, शांतता, लोकशासन आणि लोककल्याणकारी महाराज हा संदेश प्रदर्शित होतोच असे नाही. महाराज सर्व मानवांप्रती पालक आणि विश्ववंदनीय होते. यासाठी महाराजांचे शिल्प महाभव्य; परंतु सिंहासनाधिष्ठित असे प्रसन्न मुद्रेतील आणि प्रेरणादायी असावे.
२. समुद्रात बोटीने येणे-जाणे खर्चिक होईल, तसेच पावसाळ्यामध्ये शिवस्मारकाच्या दर्शनासाठी जाता येणार नाही. पर्यावरणाला धोका निर्माण होणार्या याचिका न्यायालयात गेल्याने शिवस्मारक मागे पडू शकते. राजभवन मंत्रालयासमोरील सर्व बंगले पाडून तेथे उंच आणि सिंहासनाधिष्ठित स्मारक उभे करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे काम चालू झाले असून शिवस्मारकाचे काम मात्र रामभरोसे आहे. जयललितांचे स्मारक १ सहस्र फूट उंच झाल्यास शिवस्मारक जगातील सर्वांत उंच असणार नाही.
via Blogger http://ift.tt/2heGkrU
from WordPress http://ift.tt/2heM2dq
via IFTTT
No comments:
Post a Comment