राहुल निर्मळ /
जळगाव जामोद :-
सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून जामोद येथील वृद्ध शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली
सदर घटना दि १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान उघडकीस आली .आत्महत्या ग्रस्त शेतकरी सोनाजी संपत शिरेकर वय ७० वर्ष यांचे मागील ३ ते ४ वर्षांपासूनच्या नापिकी व कर्जबाजारी पणामुळे मानसिक संतुलन बिघडले होते ते दि १८ डिसेंबर रोजी घरून निघून गेले होते .तर घरी परत आलेच नाही त्यांनी गावालगतच्या वनवासी आश्रम शाळेसमोरील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सादर प्रकार सायंकाळी गावकर्यांच्या निदर्शनास आला त्यांचेवर जामोद येथील ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याचे बोलल्या जात असून त्यांचे पश्चात २ मुले . सुना , १ मुलगी व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे सदर घटनेची तक्रार जामोद येथील पोलीस चौकीला दिल्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध क्र . ७७/०१६ कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप सोळंके यांचे मार्गदर्शनात पी. एस . आय . भंडारी सह जामोद पोलीस करीत आहे ..
via Blogger http://ift.tt/2i9bDGs
from WordPress http://ift.tt/2hZiKOx
via IFTTT
No comments:
Post a Comment