उपजिल्हाधिकार्यांना (डावीकडे) निवेदन देतांना कार्यकर्ते |
जळगाव- येथील ३१ डिसेंबर या दिवशी नववर्षोत्सवाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथील उपजिल्हाधिकारी (निवासी) श्री. राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. श्री. राहुल मुंडके यांनी ‘तुमचे कार्य कौतुकास्पद आहे आणि सनदशीर मार्गाने होणार्या या कार्याला आमचा नेहमीच पाठिंबा असेल’, असे त्यांनी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सचिन वैद्य, प्रफुल्ल टोंगे, तुषार काकड आणि प्रीतम पाटील उपस्थित होते.
via Blogger http://ift.tt/2hY1j0A
from WordPress http://ift.tt/2hXZcKp
via IFTTT
No comments:
Post a Comment