परभणी / प्रतिनिधीः
हजार आणि पाचशे च्या नोटा बंद होऊन 23 दिवसाचा कालावधी उलटला तरी सामान्य व्यापार आजतागायत सुरळीत झालेला नाही. शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद व युनियन बँकेच्या वसमत रोडवरील एटीएमवर नवीन पाचशे रूपयांच्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. बहुप्रतिक्षेनंतर या नोटा आल्याने नागरिकांनी नोटा काढण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले होते. परंतु हे व्यवहार हळूहळू सुरळीत होताना दिसत आहेत. शेतीमालाची रक्कम देण्यासाठी मोंढ्यात व्यापार्यांकडे चलनातील नोटा नाहीत त्यामुळे शेतीमालाचे व्यवहार मात्र अजूनही ठप्प आहेत. काही व्यापारी धनादेश देवून थोडीफार सोयाबीन व कापसाची खरेदी करीत आहेत. सध्या कापसाचीही आवक मंदावलेली आहे. सर्वच बँकेच्या एटीएममध्ये दोन हजाराच्या नोटा मात्र उपलब्ध चिल्लर करताना बाजारपेठेत अडचणी येत आहेत. दोन हजाराची चिल्लर करण्यासाठी हजार बाराशे रूपयांची खरेदी करावी लागते. पाचशेच्या नोटा सर्वच बँकेत उपलब्ध झाल्यास त्रास कमी होईल.
via Blogger http://ift.tt/2gPqlOj
from WordPress http://ift.tt/2gCSitb
via IFTTT
No comments:
Post a Comment