परभणी / प्रतिनिधी-
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सक्षम अपंग संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.
3 डिसेंबर रोजी जागतीक स्तरावर अपंग दिन साजरा केला जाणार असून या दिवसापर्यंत विविध मागण्यांची पुर्तता करावी अशी अपेक्षा प्रशासनाकडून संघटनेने व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. वांगी रोडवरील रेशन दुकानदाराने राजीनामा दिल्याने ते शासन निर्णयानूसार अपंगांच्या बचत गटाला द्यावे, बी.पी.एल. शिधापत्रिकेसाठी 27 ऑक्टोंबर 2005 पासून अपंगांचे प्रलंबीत असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावेत. अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजनेची 21 हजार रूपये उत्पन्नाचे अट रद्द करून तिच्यात वाढ करावी, सरकारी गाळ्यांमध्ये अपंगांना असलेला 3 टक्के आरक्षणाचा शासन आदेश परभणीत अंमलात आणावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सक्षम अपंग संघटनेचे मार्गदर्शक किर्तीकुमार बुरांडे, अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव सुनिल लहाने यांच्या सह्या आहेत.
via Blogger http://ift.tt/2gpSXAn
from WordPress http://ift.tt/2gCWYiU
via IFTTT
No comments:
Post a Comment