सामाजिक सलोखा व सौहार्द जपणे ही सर्वांचीच जबाबदारी असून विविध सण पारंपरीक एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले.
खंडोबा यात्रा, महापरिनिर्वाणदिन व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नियती ठाकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, खंडोबा यात्रा, महापरिनिर्वाणदिन व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवावा. महानगरपालिकेच्या संबंधित विभांगांनीही विविध सेवा-सुविधा तत्परतेने पुरवाव्यात. अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेऊन दुर्घटना टाळाव्यात. या कालावधीत वीजपुरवठा सुरळित राहिल याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घ्यावी, तसेच लोंबणा-या वीजेच्या तारा, वाकलेले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल हटवावे. बीएसएनएलनेही त्यांची यंत्रणा सुव्यवस्थित ठेवावी. अन्न व औषध प्रशासनाने मिठाई तसेच प्रसादाचे नमुने तपासावेत, अन्नविषबाधेसारख्या दुर्घटना होणार नाहीत यादृष्टीने दक्षता घ्यावी. प्रादेशिक परिवहन विभागाने मिरवणुकीतील वाहनांची तपासणी करून द्यावी. डीजेसंदर्भातील निर्देशांचे सर्व संबंधितांनी पालन करावे. आरोग्य शिबिरे तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रम या कालावधीत घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी केले.
via Blogger http://ift.tt/2gsAq6I
from WordPress http://ift.tt/2fMoaio
via IFTTT
No comments:
Post a Comment