परभणी :-
जागतिक एड्स दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल कुलगुरू डाॅ बी व्यंकटेश्वरलु यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखऊन रवाना केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ जावेद अथर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ व्ही आर मेकाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. रॅलीत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. एड्स निर्मुलनासाठीच्या विविध उपाययोजनांसंदर्भात यावेळी घोषणा देण्यात आल्या व फलक प्रदर्शित करण्यात आले. यावेळी एड्स निर्मुलनासंदर्भात लोककलावंतांनीही लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन केले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व आरोग्य विभागाने एड्समुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार केला आहे. आरोग्य विभाग व एड्स निर्मूलनासाठी काम करणा-या सामाजिक संस्थांनी यासंदर्भात केलेल्या जनजागृतीमुळे व एआरटीव्दारे मिळणा-या उपचारांमुळे एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण घटले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
via Blogger http://ift.tt/2fMqmX8
from WordPress http://ift.tt/2gSuyRb
via IFTTT
No comments:
Post a Comment