परभणी शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबादद्वारा संचालित ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत परभणी जिल्ह्यातील युवकांसाठी दुचाकी दुरूस्ती (टु व्हिलर रिपेअरिंग) व्यवसायासाठी विनामुल्य कौशल्य आधारित व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील (दारिद्र्य रेषेच्या यादीत समाविष्ट) बेरोजगार युवकांना घेता येऊ शकतो. प्रशिक्षणात मुख्य विषयासोबत व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, व्यवसायीक गुणवत्ता, आरोग्य, योगासने, विविध शासकिय योजनांची माहिती व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था, भोजन, चहा, अल्पोपहार इ. सोय विनामुल्य करण्यात येते. निवडीसाठी मुलाखत दि. ४ डिसेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल.
दि. ५ डिसेंबर २०१६ रोजी प्रशिक्षण वर्ग सुरू होत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संस्थेत दाखल करावेत, असे आवाहन गिरीष खवसे, संचालक, आरसेटी यांनी केले आहे.
via Blogger http://ift.tt/2gSpxZ1
from WordPress http://ift.tt/2gsts1o
via IFTTT
No comments:
Post a Comment