Latest News

अचलपूर नगरपालिका निवडणूकीत विवेक सोनपरोते सर्वाधिक मतांनी विजयी


प्रमोद नैकेले /-अचलपूर:-
अचलपूर नगरपालिका निवडणूक निर्णय नुकताच जाहीर झाला त्यामध्ये ३९ नगरसेवक व एक नगराध्यक्ष नीवडून आले.यावेळी प्रथमच निवडणूक लढत असलेले विवेक श्रीकृष्ण सोनपरोते सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले.
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी व अ वर्ग नगरपालिका असलेल्या अचलपूर नगरपरीषदेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या यामध्ये १९ प्रभागातून ३९ व सरळ जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे घटनात्मक कार्य जुळ्या शहरातील मतदारांनी केले.अतिशय चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या सुनिता नरेंद्र फिसके यांचा अवघ्या ६४० मतांनी विजय प्राप्त झाला.३९ नगरसेवकामध्ये आजी माजी काही नगरसेवक पुन्हा निवडून आले मात्र यावेळी नगरपालिका सदनात बहुतांश नवीन चेह-यांना मतदारांनी पाठवले आहे याचे कारण प्रस्थापितांच्या मागील कार्यकाळातील विकासशुन्य कारकिर्दीला मतदारांनी चोख उत्तर दिले आहे.अशा निवडणूकीत प्रभाग क्रमांक १७ ज्योतिबा फुले वार्डमधून लढत देत असलेले विवेक श्रीकृष्ण सोनपरोते भाजपा तर्फे प्रथमच निवडणूक लढवली व सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करून विजयी झाले.विवेक सोनपरोते यांना कोणताही राजकीय वारसा नसून सामान्य कुंटूबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील स्थानीक जगदंब महाविद्यालयातून लिपीक म्हणून सेवानीवृत्त झाले आई शिक्षिका आहे दोन भाऊ इंजिनिअर असून बाहेर गावी नोकरी करतात विवेक सुध्दा पदवीधर असून हाँटेल मँनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.भाजपा आदिवासी सेलचा जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांचे कडे जबाबदारी आहे.राजकारणात फारसे सक्रिय नसून सामान्य नागरिकांना सतत मदत करणे विविध सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजसेवा करीत राहणे हा विवेकचा छंद म्हणून प्रभागात सर्व जाती धर्माचे मतदारांनी त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिले.त्यांच्या रूपाने आदिवासी समाजासोबत जुळ्या शहराला एक तरूण तडपदार नेतृत्व मिळाले निवडून आल्यानंतर विवेक यांचे कडून जनतेला खुप अपेक्षा आहेत त्या पुर्ण करण्याकरिता ते नक्कीच प्रयत्न करतील अशी सर्वांना खात्री आहे म्हणुन ३९ नगरसेवक व एक नगराध्यक्ष अश्या चाळीस प्रतिनिधींच्या निवडणूकीत प्रभागातील मतदारांनी सर्वाधिक म्हणजे चक्क १६०० मतांच्या मताधिक्याने त्यांना विजयी केले.

via Blogger http://ift.tt/2gPjdRI




from WordPress http://ift.tt/2gCRYe2
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.