मानेगाव ते दादुलगाव रस्त्याचे काम सुरु करा या मागणी साठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले . या संदर्भात संबंधित गावातील नागरिकांनी या पूर्वी अनेक वेळा उपविभागीय अधिकारी यानां निवेदन दिले होते दि १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात दि ३० नोव्हेंबर रोजी मागणीला धरून ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील; असा इशारा देण्यात आला होता या बाबीची शासनाने दखल न घेतल्या मुले येथील नागरिकांनी आज दि ३० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले .या मध्ये विश्वासराव पाटील ,गजानन मानकर , भास्कर ठाकरे ,चरण घ्यार ,इत्यादी लोक प्रतिनिधींसह बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते .सदर आंदोलन कर्त्यांना शासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्या नंतर मानेगाव फाट्यावर सुरु असणारे रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले सदर रास्ता रोको आंदोलनामुळे बराच वेळ जळगाव जामोद ,नांदुरा रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती .दिलेल्या आश्वासना नंतर प्रशासनाने या बाबीकडे त्वरित लक्ष न दिल्यास परत आंदोलन छेडण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले .
via Blogger http://ift.tt/2fOw2ea
from WordPress http://ift.tt/2gLwsnN
via IFTTT
No comments:
Post a Comment