Latest News

हिंदु जनजागृती समितीचा मला अभिमान आहे ! – राहुल यादव, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, हिंदु एकता

कार्वे, तालुका कराड 
येथे हिंदु धर्मजागृती सभा 

       कराड – मुलांना इंग्रजी यायला हवे, असा आजच्या पालकांचा अट्टाहास असतो. एकवेळ शुभंकरोती आले नाही, तरी चालेल; पण जॉनी जॉनी आलेच पाहिजे, असे त्यांचे विचार आहेत. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. आज धर्मांतरासाठी पैसे दिले जातात. पाकिस्तान आपल्याला कधीही संपवू शकत नाही; पण आपलीच माणसे आपल्याला संपवतील. मला हिंदु जनजागृती समितीचा अभिमान आहे. आज देशात हिंदु जनजागृती समितीप्रमाणे कार्य करणारी संघटना नाही, असे प्रखर मार्गदर्शन हिंदु एकताचे सातार्‍याचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव यांनी केले. ते कार्वे, तालुका कराड येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेमध्ये बोलत होते. 
ते पुढे म्हणाले… 
१. हिंदूंनो, तुम्ही एका हातात कोणत्याही पक्षाचे झेंडा घेतला असेल, तरी चालेल; परंतु उजव्या हातात फक्त भगवाच असला पाहिजे. तुम्ही शेळी नसून तुम्ही वाघ आहात, हे लक्षात ठेवा ! 
२. हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे. उंब्रज, तालुका कराड येथील गोरक्षकांचे सत्कार करून त्यांनी आमचे धैर्य वाढवले आहे. 
३. गायींचे रक्षण करणे काळाची आवश्यकता आहे. जर गायी संपल्या, तर हिंदु धर्म संपेल. 


काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन 
न होणे हे दुर्दैवी ! – राहुल कोल्हापुरे

       आज सनातनच्या साधकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्था सूर्यप्रकाशाइतकी निर्दोष आहे. जनतेने काँग्रेस सरकारचा सत्तेवरून उतार केला; पण भाजप सरकारही तडजोड करत आहे. अजूनही आपण काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करू शकलेलोे नाही, हे दुर्दैवी आहे. अयोध्या राममंदिराचा विषय केवळ निवडणुकीपुरताच येतो. त्याच्या पुर्ततेची जनता वाट पहात आहे.

via Blogger http://ift.tt/2hemajI




from WordPress http://ift.tt/2icBk97
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.