Latest News

आईवडील हेच खरे तिर्थनकर व परमेश्‍वर – आचार्य पुष्पदंत सागरजी

जिल्हा प्रतिनिधी / वाशिम /
महेंद्र महाजन –

आजपर्यत कुणीही परमेश्‍वर तिर्थनकाराला बघीतलेले नाही किंवा त्यांचे वास्तविक दर्शन त्यांना घडलेले नाही. ज्या आईवडीलांनी आपणाला जन्म दिला, जग दाखविले, बोट धरुन चालणे शिकविले. ज्यांनी जगण्याची कला शिकविली. तेच खरे तिर्थनकर व परमेश्‍वर आहेत असे प्रतिपादन पुष्पगिरी तिर्थप्रणेता आचार्य परमपुज्य पुष्पदंत सागरजी महाराज यांनी केले. स्थानिक न.प. जवळील महाविर भवन येथे मंगळवार, 14 मार्च रोजी आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील प्रतिपादन केले.
    यावेळी मंचावर मुनीश्री पुज्यसागरजी महाराज उपस्थित होते. भाविक भक्तांना मार्गदर्शन करतांना आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांनी पुढे सांगीतले की, कोणत्याही ग्रंथ धर्मात आपल्या जीवनाची कहानी लिहीलेली आहे. वर्षानुवर्षे आपण तत्वाची चर्चा केल्यानंतरही आम्ही आजही अंधविश्‍वास व वेगवेगळ्या चक्रव्युहात अडकलेलो आहोत. वाईट व्यक्ती व गोष्टीच्या संगतीने जीवन उध्दवस्त होते. त्यामुळे यापासुन प्रत्येकाने दुर राहावे. आज पाश्‍चिमात्य संस्कृती हावी झाली असून आपण संस्कृतीपासुन दुरावत चाललो आहोत. झोपडपट्टीमध्येही टीव्ही सुरु आहे. या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून संस्कृतीवर आघात होत आहे. टीव्हीने सर्वाना वेड लावले असून त्यामुळे विश्‍वासघात वाढत आहे. मोबाईल खोटे बोलण्याचे सर्वात मोठे साधन झाले आहे. दुसर्‍याला ज्ञान देण्यापुर्वी प्रत्येकाने स्वत:चा चेहरा आरशात बघावा. आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा. जर बिजांकुर हे शेतकर्‍याच्या हाती पडले तर निश्‍चित त्याचे अंकुरात निर्मिती होईल. मात्र तेच बिजांकुर चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेले तर त्याचा नाश होईल. सद्गुरु व संताच्या प्रती श्रध्दा असावी. अकबराप्रमाणे बिरबलालाही सन्मान मिळाला. त्याचे कारण अकबराचा हात त्याच्या खांद्यावर होता. त्याचप्रमाणे आमच्या खांद्यावर जिनेंद्र व भगवंताचा हात आहे. सद्गुरु व संस्कृतीचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुनीश्री पुज्यसागरजी महाराज यांनी आपल्या विचारातुन आज प्रत्येक व्यक्ती सुख, शांती, समृध्दी याची कामना करत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक पुर्ण्याजन करण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. त्यामुळेच तो भरकटत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचा व आचार्यासमवेत आहारात सहभागी असलेल्या संघाचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी बरखा जैन, सौ. जैन व सौ. छाबडा यांनी आपले विचार व भक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन रवी बज यांनी केले. प्रवचनाला मोठ्या संख्येने सकल जैन समाज उपस्थित होतो

via Blogger http://ift.tt/2n84us2




from WordPress http://ift.tt/2mqnyyd
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.