अचलपूर पंचायत समितीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या.दहा गणामधे झालेल्या या निवडणूकीत भाजपने पाच जागावर विजय मिळवून मोठा पक्ष बनला पण सभापती राष्ट्रवादीे व उपसभापती पद प्रहार कडे गेल्याची आश्चर्यकारक घटना अचलपूर या ऐतिहासिक शहरात घडली.
सविस्तर वृत्त असे की नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत पाच जागा भाजपाला,तिन जागा काँग्रेसला तर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी व प्रहार ला मिळाली आज सभापती व उपसभापती पदांची निवड झाली तेव्हां सभागृहात भाजपाचे एक सदस्य गैरहजर असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी व प्रहार यांच्या पाच मतांनी देवेंद्र पेटकर यांना सभापती म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले तर प्रहारच्या सोनाली तट्टे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या.सर्वात मोठा पक्ष भाजपा असतांना सुध्दा केवळ एक सदस्य असलेल्या राष्ट्रवादी व प्रहार यांच्या वाट्याला सभापती व उपसभापती पद गेल्याचे कारण म्हणजे भाजपचे आशिष जावरकर सभागृहात उपस्थित राहू शकले नाही यामागे खरे कारण समजू शकले नाही पण या गैरहजर प्रकरणाबाबत स्थानीक भाजपा कार्यकर्त्यामध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
via Blogger http://ift.tt/2nCFTs2
from WordPress http://ift.tt/2mLG86j
via IFTTT
No comments:
Post a Comment