येथील सामाजीक कार्यकर्ते तथा भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लॉ. वसंतराव धाडवे यांना शनिवार, 11 मार्च रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणार्या संत रविदास समाजभुषण या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीङ्गळ, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व एकवीस हजार रुपये असे आहे. नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजीक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या शुभहस्ते व आमदार अमर राजुरकर, आमदार सुभाष साबने, आमदार नागेश आष्टीकर, आमदार तुषार राठोड, आमदार हेमंत पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जि.प. अध्यक्षा सौ. मंगलाताई गंडवे, महापौर शैलजा स्वामी, जिल्हाधिकारी तथा सामाजीक न्याय विभागाचे अपर सचिव सदानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉ. वसंतराव धाडवे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेतांना धाडवे यांच्या पत्नी सौ. सुनंदा धाडवे, मुलगा डॉ. प्रविण धाडवे, ऍड. प्रशांत धाडवे यावेळी उपस्थित होते. यावेळी धाडवे यांनी सदर पुरस्काराच्या रकमेत पदरचे 30 हजार रुपये टाकुन अशी 51 हजार रुपयाची राशी अनुसुचित जाती आश्रम शाळेला देण्याचे घोषित केले. वसंतराव धाडवे यांनी सामाजीक बांधीलकी ठेवून अनेक होतकरु गरीबांना मदत केली. रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहण्याचे काम त्यांनी केले. धाडवे यांना यापुर्वी सामाजीक कार्याबद्दल डॉ. आंबेडकर ङ्गेलोशिप दिल्ली, विसावी शताब्दी रत्न पुरस्कार पानीपत हरिणाया, राष्ट्रीय विकास रत्न पुरस्कार मुंबई, महाराष्ट्र गौरव पुरस्कार परभणी, राज्यस्तरीय आदर्श कामगार गौरव पुरस्कार मुंबई, समाजभुषण पुरस्कार पुणे, संत रोहीदास सामाजीक गौरव पुरस्कार मुंबई, सेवा गौरव पुरस्कार परळी, संत रोहीदास धन्वंतरी गौरव पुरस्कार कोल्हापुर, समाजरत्न पुरस्कार लातुर, राष्ट्रीय ब्रेव्हरी इंटरप्रेन्युर अवार्ड नवी दिल्ली आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून विविध सामाजीक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.
via Blogger http://ift.tt/2n80VlO
from WordPress http://ift.tt/2mqooeg
via IFTTT
No comments:
Post a Comment