वाशीम जिल्हा निर्मितीला 18 वर्षाचा कालखंड झाल्यानंतरही अद्यापही जिल्हयाच्या विकासाला चालना मिळालेली नाही. पुसद व हिंगोली नाक्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. मुंबई येथे जाण्याकरीता वाशीम येथून रेल्वे सुविधा आवश्यक आहे. सोबतच विविध कार्यालयात कर्मचार्यांची कमी कायम असून महावितरणचा मनमानी कारभार सुरु असून अवाजवी बिले दिल्या जात असल्याने याकडे शासनाने लक्ष द्यावे. यासाठी तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वाशीम जिल्हयाचे सहपालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मुंबई येथे भेट घेवून त्यांना निवेदन दिले. व विविध विषयावर चर्चा करुन वाशीम जिल्हयाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला. यावेळी मान्यवरांनी जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगीतले.
सोबतच विरोधी पक्षनेते मुंडे यांनी जिल्हयाच्या समस्याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगीतले.
via Blogger http://ift.tt/2n88gBN
from WordPress http://ift.tt/2mLHeyR
via IFTTT
No comments:
Post a Comment