पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये करण्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन सभापती गजाननराव भोने व गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी शिक्षकांना दिले. यासंदर्भात 4 मार्च रोजी पंचायत समिती अंतर्गत येणार्या सर्व शिक्षकांनी सभापती व गटशिक्षणाधिकारी एक निवेदन देवून शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये करण्याची मागणी केली होती.
या निवेदनात नमूद केले आहे की, मागील दोन महिन्यापासून वाशीम पंचायत समितीमधील सर्व शिक्षकाचें पगार सीएमपी प्रणालीव्दारे सहकारी बँकेत जमा होत आहे. सीएमपी व्दारे जमा होणारे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा होणे अपेक्षीत होते. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा झाल्यास सर्व शिक्षक नेट बँकींगचा वापर करुन सर्व व्यवहार कॅशलेश पध्दतीने करु शकतील. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘कॅशलेश भारत’ या संकल्पनेला हातभार लागेल. राष्ट्रीयकृत बँकेत पगार जमा झाल्यास गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, पीपीएङ्ग खाते व वैयक्तीक कर्ज खाते प्रक्रिया सुलभ होवून त्वरीत कर्ज मिळेल. शिक्षकांना आपली पगाररुपी कमाई कुठे जमा करावी हा त्यांचा हक्क असून त्यांना सक्ती करुन त्यांच्या हक्काने हनन करण्यासारखे आहे. राष्ट्रीयकृत बँकेत पगार जमा करण्यासंदर्भात सर्व शिक्षकांची संमती आहे. त्यामुळे पगार बिलामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक समाविष्ट करुन शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेतच जमा करावा अशी मागणी गटशिक्षणाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातुन शिक्षकांनी केली. यावेळी निवेदन देतांना बहूसंख्य मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षकांची उपस्थिती होती.
via Blogger http://ift.tt/2mYID2z
from WordPress http://ift.tt/2m7DAPI
via IFTTT
No comments:
Post a Comment